HW News Marathi
कृषी

कै.वसंतराव नाईक जयंतीच्या दिवशी कृषी दिन साजरा करण्यात आला.

उत्तम बाबळे

नांदेड :- माजी मुख्यमंत्री तथा हरीत क्रांतीचे जनक कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी नांदेड जिल्ह्यात शासकीय व निमशासकीय कार्यालये,शाळा,संस्था,आदी ठिकाणी शासकीय अधिकारी,कर्मचारी,पक्ष पदाधिकारी,सामाजिक संघटना व पदाधिकारी,पत्रकार,शेतकरी व नागरीकांनी वृक्ष दिंडी काढून रोपे लाऊन कृषिदिन साजरा केला. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ४ कोटी वृक्ष लागवड सप्ताहाचा शुभारंभ विविध कार्यक्रम राबऊन करण्यात आला. त्याच अनुशंगाने भोकर व तालुक्यात ही मोठ्या उत्साहात हा उपक्रम राबविण्यात आला.दि.१ जुलै २०१७ रोजी सकाळी विविध शासकीय,निमशासकीय कार्यालये,शाळा,महाविद्यालये,नगर परिषद,ग्राम पंचायती आदी ठिकाणी माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित अभिवाद करूण जयंती साजरी केली. भोकर वन परिक्षेत्र अधिकारीकार्यालया मार्फत पुरविण्यात आलेल्या वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली.वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय व कें.प्रा.नूतन शाळा भोकर च्या संयुक्त विद्यमाने टाळ मृदंगाच्या गजरात अधिकारी,कर्मचारी,शिक्षक व विद्यार्थ्यांनी शहरातून वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयापर्यंत वृक्षदिंडी काढली.तसेच भोकर न्यायालय,तहसिल कार्यालय,पोलीस ठाणे,नगर परिषद आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भोकर न्यायालयाच्या प्रांगणात व परिसरात जिल्हा सत्र न्यायाधिश एम.एस.शेख,जिल्हा न्यायाधिश डी.जी.कांबळे, प्रथम न्यायदंडाधिकारी पि.जी.महाळंकर, दिवाणी न्यायाधिश बी.ए.तळेकर,उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके,तहसिलदार व्यंकटेश मुंडे, पो.नि.संदिपान शेळके, सरकारी वकील अॅड.एस.आर.कस्तुरे,अ.संघ अध्यक्ष अॅड.उत्तम हाके,अॅड.गोविंदराव लामकाणीकर,अॅड.सतिश कुंटे,अॅड.संदिप कुंभेकर,अॅड.परमेश्वर पांचाळ,अॅड.एन.पी.कोरेवाड,अॅड.दिपक भातलवंडे, अॅड.एस.एम.कांबळे,पत्रकार प्रतिनिधी संपादक उत्तम बाबळे,बी.आर.पांचाळ,राजेश वाघमारे यांसह न्यायालयीन कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले.तर नुतन शाळा,तहसिल कार्यालय व पोलीस ठाणे परिसरात उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,उपविभागीय पो.अ.दत्तात्रय वाळके,तहसिलदार व्यंकटेश मुंडे,पो.नि.शेळके,वन परिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे,ना.तहसिलदार मारोती जगताप,नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड,सहा.पो.नि.सुरेश भाले,पो.उप.नि.चव्हाण,संपादक उत्तम बाबळे,बी.आर.पांचाळ,मनोज गीमेकर,राजेश वाघमारे,वनपाल अंगद खटाणे,मुख्याद्यापक बास्टेवाड यांसह आदींनी वृक्ष रोपांची लागवड केली आणि कृषिदिन साजरा केला.तसेच वृक्ष लागवडीसह संवर्धनाचा संकल्प यावेळी करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला लाईक करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://twitter.com/Mahabatmi1

https://plus.google.com/u/0/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत      

News Desk

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

News Desk

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk