HW News Marathi
कृषी

शेतकरी पुत्राची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

बुलढाणा | नांदुरा तालुक्यातील वाडी येथील रामेश्वर साहेबराव खाडे यांनी आज सत्यवान तोताराम खाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. सद्या खरीप हंगाम जवळ आला असून सरकारचे कर्जमाफीचे घोंगडे अद्याप भिजत असल्याने बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे पेरणी कशी करायची या द्विधा मनस्थितीत सापडल्याने या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

रामेश्वर यांचे वडील साहेबराव शामराव खाडे यांचे नावे मौजे वाडी येथे २.०३ हेक्टर शेती आहे. यावर्षी त्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते. त्यांच्या शेतावर स्टेट बँक ऑफ इंडिया नांदुरा शाखेचे सन २०१२-१३ मध्ये ३० हजार रुपयांचे कर्ज असून कर्जमाफीबाबत कोणतेही पत्र बँकेकडून अद्यापपर्यंत त्यांना प्राप्त झाले नव्हते. कर्जमाफी नाही त्यातच जवळ पैसे नसल्याने पेरणी करावी तरी कशी या चिंतेने ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

News Desk

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत योजनेसाठी विविध घटकांनी 31 जुलै पर्यंत नोंदणी करा – कृषी विभागाचे आवाहन

News Desk

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून ४५०० कोटींचे पॅकेज

swarit
राजकारण

मुख्यमंत्री अखेर पिचक्या पाठकण्याचे निघाले | उद्धव ठाकरे

News Desk

मुंबई | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. ‘स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही’, उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कदापि कोकणच्या भूमीत येणार नाही, ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही हा प्रकल्प लादला गेला. हा विश्वासघात असून महाराष्ट्राच्या शब्दास दिल्लीत किंमत नाही.

स्थानिक आणि शिवसेनेचा या प्रकल्पा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांसोबत सामंज्य करारावर दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी या प्रकल्पासाठी ५० टक्के गुंतवणूक करणार आहे.

Related posts

जाणून घ्या…प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या वादामागचे नेमके कारण काय?

News Desk

पंढरपूरच्या सभेतून शिवसेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

News Desk

पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रमध्ये बदल नक्की घडेल !

News Desk