HW News Marathi
कृषी

फळं खरेदीसाठी चीनी व्यापारी शेतक-यांच्या बांधावर

पुणे: चीन वस्तुंनी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातलेला आहेच. आता चीनी शेतकरी शेतक-यांच्या बांधावर पोहोचला आहे. इंदापूर तालुक्यातील एका शेतक ºयांच्या बांधावर चीनच्या फळविक्रेत्यांनी हजेरी लावून डांळिंबाची खरेदी केली.

दादा जाधव या शेतक-याने डाळिंबाचे दजेर्दार उत्पादन घेत थेट चिनी व्यापाºयांना भुरळ घातली. चीनी व्यापारी थेट डाळिंबाची बाग पाहाण्यासाठी आणि डाळिंब खरेदी करण्यासाठी, हजारो मैलाचा प्रवास करुन शेतकºयांच्या बांधावर आले आहेत. मिस्टर हू आणि मिसेस हूआये हे चीनमधील फळांचे व्यापारी आहेत. भारतातील चांगल्या प्रतीचा माल घेऊन, तोच माल ते मलेशिया, हाँगकाँगला पाठवतात. त्यासाठी दिल्लीचे व्यापारी अमन आदर्शी हे त्यांना मदत करतात. आज ते पुणे जिह्यातील इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील दादा जाधव यांच्या शेतात डाळिंबाची खरेदी करण्यासाठी आले होते. असे दादा जाधव या शेतक ºयाने सांगितले. दादा जाधव यांनी जैविक पद्धतीने दोन एकर बागेत डाळिंबाची बाग लावली आहे. आज प्रत्येक झाडास ५० किलोहून अधिक फळे लागलेली आहेत. बाग आणि बागेतील डाळिंब एवढ्या उत्कृष्ट प्रतीची आहेत की पंचक्रोशीतील शेतकरी ही बाग पाहण्यासाठी त्यांच्या शेतात गर्दी करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1 नोव्हेंबरपासून यंदाचा उस गाळप हंगाम

News Desk

बोंड अळी प्रादुर्भावामुळे तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल

News Desk

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

News Desk