HW News Marathi
क्राइम

अल्पवयीन तरुणीने प्रियकराच्या सहाय्याने स्वतःच्याच घरी केली दागिन्यांची चोरी

औरंगाबाद प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. मात्र औरंगाबादमधील एका अल्पवयीन मुलीनं प्रियकरासाठी केलेला गुन्हा तिला चांगलाच अंगलट आला आहे. प्रियकराच्या सांगण्यावरुन त्याच्याच सहाय्याने तिने स्वत:च्याच घरातील दागिने चोरले असून तिच्यासह प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तरुणीला हा गुन्हा करण्यासाठी भाग पाडणाऱ्या अक्षय वाहूळ नावाच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. अक्षयनं अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करुन तिला आईचे दागिने आणि पैशांवर डल्ला मारायला सांगितलं. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनं देखील आईचा विचार न करता घरातील दागिने आणि रक्कम चोरली.

आैरंगाबाद येथे भाजी पाला विकून आपल्या एकुलत्या एक मुलीसह एक कुटूंब आपला उदरनिर्वाह करते. १७ मार्च रोजी या कुटूंबीयांच्या घरी चोरी झाली. मुलीच्या लग्नासाठी एक-एक रुपया जमा करुन विकत घेतलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं लक्षात येताच हे कुटूंबिय हताष झाले.या चोरी विषयी माहीती दिल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा घराचं कुलूप उघडताना कुठलीही तोडफोड झाली नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आले.शिवाय ज्या पोटीत सोनं ठेवले होतं,त्या पेटीची चावी ज्या तेलाच्या किटलीत ठेवलेली होती ती चावी चोरट्यांना सहजरित्या सापडल्याने पोलिसांची या चाेरीविषयी शंका बळावली.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रियकराच्या मदतीने त्याच कुटूंबातील अल्पवयीन मुलीने ते दागीने चोरल्याचे निदर्शनास आले.ते दागिने लांबवल्याची कबुलीही त्या तरुणीने दिली.तिच्या त्या प्रियकराने यापूर्वीही चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आपल्या मुलीने चोरी केली आहे, तर तिला शिक्षा व्हायलाच हवी, असा पवित्रा काळजावर दगड ठेवून तिच्या आईने घेतला आणि मुलीविरोधात रितसर तक्रार नोंदवली. तरुणीला हा गुन्हा करण्यासाठी भाग पाडणाऱ्या अक्षय वाहूळ नावाच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. अक्षयनं अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करुन तिच्या आईचे दागिने आणि पैशांवर डल्ला मारायला सांगितले. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनं देखील आईचा विचार न करता घरातील दागिने आणि रक्कम चोरली.

या चोरीप्रकरणी पोलिसांनी प्रियकर व प्रियसी दोघांनाही ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे, तर तिचा प्रियकराची तुरुंगाच रवानगी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगर महापालिका आयुक्तांसह डीसीपी, एसीपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार

News Desk

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk

भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा आरोप, तर यावर सोमैय्या म्हणतात-

News Desk