HW News Marathi
क्राइम

चित्रपटात काम न मिळाल्याने विक्रांतने केला आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई चित्रपटात काम न मिळाल्याने एका तरूणांने मानेवर व हातावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रत्न केला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आेह. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेऊन तरूणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने तरूणाचे प्राण वाचले. विक्रांत दुबे (23) असे तरूणाचे नाव असून मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. अशी माहिती वनराई पोलिसांनी दिली. चित्रपटात काम मिळत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

विक्रांत काही महिण्यापुर्वी मुंबईत चित्रपटात करियर करण्यासाठी आला होता. गोरगाव परिसरातील वनराई येथे तो फ्लॅट भाड्याने घेऊन राहतो. शुक्रवारी रात्री विक्रांतचे वडील वनरई पोलिसांना आपला मुलगा आत्महत्या करणार असल्याची माहिती देत त्याला वचवा असे विनंती केली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर सहकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडून प्रवेश केला. बाथरूमचा दरवाजाही आतून बंद होता, विक्रांत उघडत नसल्याने पोलिसांनी तो दरवाजाही तोडला. त्या वेळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्याच्या मानेवर त्याने ब्लेडने वार केले होते आणि एका हाताची नस कापली होती. पोलिसांनी तातडीने त्याला परिसरातील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्या घरच्यांना पोलिसांनी माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला लाईक करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

4 लाखाची लाच, पठ्ठ्याने साखरेचं पोतंही सोडलं नाही; ग्रामविकास अधिकारी रंगेहात फसला

Manasi Devkar

तीन महिन्याच्या बाळाच्या आणि पतीच्या गळयावर चाकू ठेवून महिलेवर सामूहिक बलात्कार

News Desk

अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्याला सक्त मजुरीची शिक्षा

News Desk