HW News Marathi
क्राइम

विनयभंग प्रकरणी ३ वर्षाची शिक्षा

उत्तम बाबळे
नांदेड :- हिमायतनगर तालुक्यातील एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीची विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला भोकर अति.जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस.एम शेख यांनी २८ जुलै रोजी ३ वर्ष सक्त मजूरी व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. माै.एकंबा ता.हिमायतनगर येथील एका मागासवर्गीय १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची देवराव उर्फ बाळू आनंदराव कल्याणकर (२५) रा.एकंबा याने दि.१९ फेब्रुवारी २०१६ रोजी तिच्या राहत्या घरी वाईट हेतूने छेड काढून जातीवाचक शिवीगाळ करुन विनयभंग केला.या प्रकरणी गुरन ३५/२०१६ कलम ३५४ (अ),४५१ व बाल लैगींक अत्त्याचार गुन्ह्यासह अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीच्या मुलीच्या फिर्यादीवरुन हिमायतनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील गुन्ह्याच्या भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी योगशकुमार शर्मा यांनी सखोल तपास करुन आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र भोकर अति.जिल्हा व सत्र न्यालयात ४/२०१६ क्रमांकानुसार खटला दाखल केला होता.न्यायालयाने या गुन्ह्यात एकूण ६ साक्षीदार तपासले .पैकी पिडीत मुलगी,तिची आई व आजोबा यांची साक्ष सबळ ठरली.सरकारी वकील अॅड.एस.आर.कस्तूरे व आरोपीच्या बाजूने अॅड.बी.एम.कुंभेकर आणि अॅड.एस.बी.पवार यांनी युक्तीवाद केला.युक्तीवादाअंती ३ साक्षीदारांचे पुरावे आरोपी विरुद्ध गेले.या सबळ पुराव्यावरुन अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ एस.एम.शेख यांनी आरोपी देवराव कल्याणकर यास ३ वर्ष सक्त मजूरी व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.तसेच पिडीत मुलीला १० हजार रुपये सानुग्रह निधी देण्यात यावा असे आदेश देण्यात आले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नक्षलींशी लढताना २४ वर्षिय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

News Desk

महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र…

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Aprna
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Related posts

दक्षिण आशियामध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी अल कायदा प्रयत्नशील

News Desk

राहुल गांधी, शशी थरुर यांनी केली कोरोनाग्रस्तांना मदत

swarit

कर्ज होणार स्वस्त, रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात

News Desk