HW News Marathi
क्राइम

भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची क्रूर हत्या

नालासोपारा | नालासोपाऱ्यात भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण (वय ३२) यांची आज हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक बातमीमुळे नालासोपाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. वसई-विरारच्या भाजप युवती जिल्हा सहप्रमुख होत्या झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत आहेत. त्यांच्या अंगावर इस्त्रीचे चटके देऊन, त्यांना शॉक देण्यात आला. त्यानंतर त्यांना ठार मारण्यात आले. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल नकरण्यात आला आहे.

रुपाली चव्हाण यांचा अल्प परिचय

रुपाली चव्हाण नालासोपारा वेस्टमध्ये तपस्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. पूनम घटस्फोटित असून त्यांच्या चव्हाण या त्यांच्या वडिलसोबत राहात होत्या. त्यांना १०वर्षाचा मुलगा होता. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या. नालासोपाऱ्यात येऊन त्यांना दोन वर्ष झाली होती. त्यांचा मुलगा त्यांच्या वडिलांसोबत राहत होता. नवीन दुकान घेतले होते. पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सुरु करणार होत्या. आज (९ऑक्टोबर ) चव्हाण यांच्या दुकानाचे उदघाटन होते. त्या फोन रिसिव्ह करत नसल्यामुळे एकास घरी जाऊन पाहायला सांगितले. तेव्हा त्यांना रुपाली चव्हाण यांचा मृतदेह कुजलेला मृतदेह दिसला. त्यांच्या शरीरावर वार केले होते. अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जेष्ठ आंबेडकर विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा खून

News Desk

“आताच्या पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती, तर परबांवर अजुन विश्वास बसला असता”- नितेश राणे

News Desk

वाशिम जिल्ह्यात ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

News Desk
नवरात्रोत्सव २०१८

नवरात्रीनिमित्त दांडिया आणि घागरा-चोलीची बाजारात विक्री

Gauri Tilekar

मुंबई | नवरात्री उत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना उत्सवाचे रंग आतापासून वातावरणात भरू लागले आहेत. दांडिया आणि रास गरब्यासाठीच्या वस्तू खरेदीसाठी कुर्ला,दादर,घाटकोपर, लालबाग, या सर्व ठिकाणी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. सुंदर मोराचे नक्षीकाम केलेले आकर्षक घागरे, चनिया चोली, कवड्या व मण्यांचा वापर करून तयार केलेले रंगीबेरंगी जॅकेट यांसह विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.

घागरा खरेदीसाठी उत्साह

दांडिया खेळण्यासाठी संपूर्ण साज-श्रृंगार खरेदी करण्याकडे तरुणींचा कल दिसून येत असून, त्यासाठी बाजारात गर्दी झालेली आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये राजस्थानी पेहराव, दागिने दुकानाच्या दर्शनीय भागात लावण्यात आले आहेत. त्यात मुलींसाठी काठेवाडी पॅटर्न, कच्छी पॅटर्न तर मुलांसाठी काठेवाडी कुर्ते, फेटा, धोती, थ्री-पीस विक्रीसाठी किंवा भाडेतत्त्वावर देण्यात येतात. दागिन्यांचा संपूर्ण साज चारशे ते एक हजार रुपयांपर्यंत आहे. त्यापेक्षा उत्कृष्ट क्वॉलिटीचा साज दीड ते साडेतीन हजार रुपयांदरम्यान उपलब्ध आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेकांनी हे ड्रेस खरेदी करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून ठेवली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

नवरात्रीसाठी राजस्थान, मेवाड, बडोदा, सुरत,मध्य प्रदेश या ठिकाणी खास तयार करण्यात आलेले बांधणीचे कपडे घेऊन अनेक कारागीर आणि विक्रेते मुंबईत दाखल झाले आहेत. गरबा-दांडिया खेळण्यासाठी वेशभूषेचा महत्त्वाचा भाग असलेल्या राजस्थानी घागऱ्याला विशेष मागणी असून त्यात सुंदर नक्षीकाम असलेले घागरे,साडय़ा, चनिया चोली, धोती कुर्त्यांकडे तरुणाईचाअधिक कल असल्याचं दिसत आहे. रंगीबेरंगी चनिया चोली बाजारात सर्वाचेच लक्ष वेधून घेत असून लाल, पिवळ्या, निळ्या, तसेच काळ्या, हिरव्या अशा विविध रंगांच्या चनिया चोली आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

कच्छी भरतकाम केलेल्या चनिया चोली सर्व वयोगटांतील महिला वर्गासाठी उपलब्ध असून मिरर वर्क, बॉर्डर स्टाइल, गोटा वर्क अशी विविध कारागिरी केलेल्या चनिया चोलीलासुद्धा मागणी आहे.सध्या खास राजस्थानी स्टाइल कुर्ती व धोत्यांनाही अधिक मागणी आहे. तसंच पारंपरिक गुजराती,मारवाडी पद्धतीचे कपडे बाजारात सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याशिवाय खास महिलांसाठी विविध रंगाचे झुमके, बांगड्या, ऑक्साईडची ज्वेलरी, मिरर वर्क असलेले दागिने बाजारात उपलब्ध झाले आहेत.

ऑनलाइन खरेदी जोरात

त्याशिवाय नानाविध वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या अनेक कंपन्यांनी अगदी तव्यापासून गॅस शेगड्यांपर्यंत, तसेच कपडे, चप्पल, बूट, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू अादींवर भरघोस सूट देऊ केली आहे. त्यामुळे असंख्य ग्राहकांकडून अशा ऑनलाइन खरेदीवरदेखील भर दिला जात आहे.

Related posts

आजचा रंग गुलाबी, ‘सिद्धीदात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

आजचा रंग जांभळा, ‘महागौरी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

आदिशक्तीच्या आभूषणांना हिऱ्यांची सजावट

Gauri Tilekar