HW News Marathi
क्राइम

मुलींची छेड करणाऱ्या क्‍लासच्या व्यवस्थापकाला चोप

औरंगाबाद येथे खाजगी क्लासेसच्या प्रमुखाने विद्यार्थ्यींनीला छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थींनीला अनेक दिवसापासून त्रास देत होता. युवासेनेला जेव्हा माहिती मिळताच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खाजगी क्लासेसच्या व्यवस्थापकाला बेदम मारहान केले. आकाशवाणीलगत असलेल्या खासगी क्‍लासमध्ये वैद्यकीय, जेईई, आयआयटी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थिनी येतात. मात्र, येथील शाखा व्यवस्थापक शिवहरी वाघ व शाखाप्रमुख रोहित सूळ हे आम्हाला गेल्या वर्षभरापासून छेडत होते, असे विद्यार्थिनींनी सांगितले. विद्यार्थिनींना संपर्क क्रमांक मागणे, त्यांच्या दिसण्यावरून अश्‍लील बोलणे, टोमणे मारणे असे प्रकार ते दोघे करीत होते . एका विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. तिच्या भावाने युवा सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कळविले. त्यानंतर थोरात, संजय हरणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी क्‍लासमध्ये जाऊन वाघ व सूळ यांना जाब विचारून तोडफोड केली. त्यानंतर त्यांना रस्त्यावर बेदम चोप दिला. पोलिस तेथे आल्यानंतर त्यांनी दोघांची सुटका करून त्यांना पोलिस ठाण्यात नेले असून क्लास व्यवस्थाकाविरोधात पोलिस गुन्हा दाखल केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रॅक्टरच्या आमिष व फसवणूकप्रकरणी चेतन भालचंद्र नांदणीकरांना अटक

News Desk

अनिल देशमुखांना झटका! CBI न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला

Aprna

ट्रक आणि कारमध्ये भिषण अपघात, 9 जण जखमी

News Desk