नवी दिल्ली (वृत्तसंस्था): इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून पाच तरुणांना केरळमधून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कन्नूर भागात २५ आॅक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. इसिसच्या संपर्कात असलेले भारतीय तरुण परदेशातून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. या पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर कन्नूरचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. सदानंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची कसून चौकशी केली. यावेळी हे तीघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे. केरळमधील वेलापट्टणम आणि चक्करकल या भागातील ते मुळचे रहिवासी आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.