HW News Marathi
क्राइम

बीडमध्ये चोरट्यांचा प्रताप; पोलिसांच्या नाकर्तेपणावर जनता संतापली

बीड | बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील बीड पिंपळनेर रस्त्यावरील गावांत काही घरे आणि बस स्थानकावरील ८ ते ९ ठिकाणी चोऱ्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक दिवसनपासू चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. मागील ६ महिन्यांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, अद्याप कसल्याही छोट्या मोठ्या चोराचा थांगपत्ता देखील लागलेला नाही ही आश्चर्यकारक बाब आहे.

या घटनेबाबद व्यपारी संघाचे अध्यक्ष संतोष सोहनी यांनी संताप व्यत केला असून तात्काळ चोरट्यांना अटक करा अशी मागणी केलीय. गुरुवारी रात्री १ वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत दोन चोरट्यांनी तब्बल 9ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केलाय त्यापैकी चार ठिकाणी ते यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये सदगुरू जिनिंग येथील २ लाख, मोहिनीराज हार्डवेअर ५०० रु, गुगळादेवी कापड दुकानातून महागड्या साड्या आणि काही रोख रक्कम, आणि म्हाळसापूर येथील उमाबाई झरेकर यांच्या घरातील २० हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले आहेत.

संबंधित दोन चोरट्यांनी मोठ्या कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून, शटर तोडून आत मध्ये प्रवेश करून निवांत चोऱ्या केल्याचं CCTV कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आले आहे. दुसरीकडे पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर घरे, दुकाने फोडली जात आहेत. तर परीसरातील नागरिकांच काय? असा सवाल उपस्थित झालाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार घरफोड्या आणि दुकाने फोडण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचे सतर्क झालेलं दिसत नाही.

दरम्यान, जागते पहारे द्या, रखवालदार ठेवा, सतर्क राहा, CCTV कॅमेरे बसवा, असे सल्ले पोलिसांकडून दिले जात आहेत. एकेकाळी पिंपळनेर पोलिस ठाणे आणि परिसर गजानन जाधव यांच्या निगराणीत होता. अवैध धंदे आणि, चोऱ्या, लूटमार, बांधावरून वाद, कौटुंबिक वाद, शाळकरी मुलींची छेड छाड, दारूड्यांची रस्त्यावरून चालायची हिंमत नव्हती. खुनासारखे प्रकार ऐकावयास देखील मिळत नव्हते. एवढंच नाही तर टवाळखोर तरुणांच्या हेअरस्टाईल सुद्धा बदलल्या होत्या. अशाप्रकारे गजानन जाधव यांच्या खादीचा दरारा होता आणि त्यावेळी गजानन जाधव यांना जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं आणि खराखुरा सिंघम म्हणून त्याना संबोधलं जायचं.

आजही गजानन जाधव यांच्या आठवणी अशा घटना घडल्यानंतर सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहेत. त्यामुळे पिंपळनेर ठाण्याचे सूत्र हाती असलेल्या API आघाव यांनी देखील आता अशा काळात सिंघम होण्याची गरज आहे, खडबडून जागे होऊन रस्त्यावर उतरवून खाकीची धमक दाखवणे गरजेचे आहे, तेव्हा कुठेतरी या घटनांना चाप बसेल अन्यथा आशा घटना घडत राहतील हे सत्य नाकारता येणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोधडी येथे जुगार अड्यावर छापा, ११ जणांसह ६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त

News Desk

चालत्या बसमधील सेक्स व्हिडीओ, भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा

News Desk

छगन भुजबळांची 300 कोटींची संपत्ती जप्त

News Desk