HW News Marathi
क्राइम

दिवसाढवळ्या पार्कमध्ये सेक्स

वॉशिंग्टन: अमेरिकेतील एका जोडप्याचे सेक्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. एक जोडपं पार्कमधील बेंचवर बसून दिवसाढवळ्या सेक्स करताना दिसत आहे. दांपत्यावर सार्वजनिक नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सोबतच एक वर्षाच्या कारावासाचीही शिक्षा होण्याची शक्यता आहे. ही घटना अमेरिकेतील इलिनोए येथील आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हे दांपत्य बिनधास्तपणे पार्कमध्ये बसून सेक्स करत आहे. यावेळी तिथे उपस्थित एका व्यक्तीने हे कृत्य कॅमेºयात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. विशेष म्हणजे, जेव्हा ती व्यक्ती दांपत्याचं व्हिडीओ रेकॉर्र्डिंग करत होती, तेव्हा महिलेने त्याला पाहिलेले आहे. यावेळी ती त्याच्याकडे पाहून हसत होती. यानंतर महिला व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्यासाठी व्यक्तीला सुनावते. मी माझ्या पतीसोबत आहे, असे सांगतानाही ती दिसत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही अशा प्रकारची एक घटना समोर आली होती. त्यावेळी सेक्स करत असलेल्या दांपत्याने पोलिसांचा आदेश मानण्यास नकार दिला होता. हे दांपत्या कारच्या मागील सीटवर सेक्स करत होतं. आदेश मानण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांकडून आरोपीची हत्या

News Desk

मुलीची हत्या प्रकऱणी बापाला फाशी

News Desk

प्रेमभंग झाला म्हणून पूर्वप्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर केले अपलोड

News Desk