HW News Marathi
क्राइम

केईएम रुग्णालयातील फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई | केईएम रुग्णालयामध्ये फिजीओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेली ओंकार महेश ठाकूर या २१ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ओंकार हा दादर पश्चिम येथील बाल गोविंदास रोडवर असलेल्या कोहिनूर टॉवर इमारतीत ओंकार हा कुटुंबियासोबत राहात होता.

ओंकारने आज (१७ जून) पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. पहाटे स्थानिकांना तो जखमी अवस्थेत दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीपार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तत्काळ उपचारांसाठी सायन रुग्णालयामध्ये नेले. मात्र येथील डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल होताच आरोपी अटक

News Desk

“शेतकऱ्यांच्या मृत्यूवर PM मोदी गप्प का”? – कन्हैया

News Desk

“वानखेडे मोदींच्या पुढचे निघाले” एक कोटांच्या पुढे घड्याळाची किंमत?- नवाब मलिक

News Desk