मुंबई | गोखले पूल दुर्घटनेनंतर तब्बल १६ तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. अंधेरी स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसात वाजता कोसळला. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दुर्घटनेत पाज जखमी झाले आहेत.
मंगळवारी रात्री आठ वाजता पश्चिम रेल्वेने अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने ट्रायल लोकल सोडण्यात आली होती. यानंतर ८ वाजून २३ मिनिटांने चर्चगेटच्या दिशेने जलग मार्गावरील वाहतूक सुरू झाली. मध्यरात्री एक वाजता चर्चगेटच्या दिशेने धीम्या मार्गावरील वाहतूक सेवा सुरळीत झाली.
परंतु गोखले पूल दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. जोगेश्वरीचा बाळासाहेब ठाकरे पूल,सांताक्रझूचा मिलन फ्याओव्हर, मालाड-गोरेगावचा मृणालताई गोरे फ्याओव्हर, विलेपार्लेचा कॅप्टन गोरे पूल आणि अंधेरी-खारचा मिलन सबवे या नागरिकांना पर्यांयी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Advisory: #GokhaleFlyover will be closed for traffic for repair work for a few days. Commuters are advised to take route thru Balasaheb Thakre bridge Jogeshwari /Milan flyover Santacruz/Mrunal tai Gore flyover Malad Goregaon/Captain Gore bridge Parla / Andheri-Khar-Milan subway
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 3, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.