नवी मुंबई – येथील पाम बीच मार्गावर सोमवारी सकाळी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मरियम अब्दुल रहिम शेख (२०) असे मृत तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे केवळ २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. इम्रान खुद्देश सलमानी (२०) असे आरोपीचे नाव असून त्याने एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
इम्रानचे मरियमवर एकतर्फी प्रेम होते. मरियमचा साखरपुडा दुसऱ्या मुलाबरोबर झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी त्याने गळा दाबून तिची हत्या केली. सोमवारी करावे गावात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने नवी मुंबई परिमंडळ १ मधील पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. या वेळी ही मुलगी सीवुड्समधील‘ग्रेसफुल हेअर कटिंग सलून’ व ‘ब्युटी पार्लर’मध्ये नोकरी करीत होती असे पोलिसांना समजले. त्यानंतर तिची ओळख पटली आणि ती गोवंडीमध्ये राहात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी पार्लरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता याच सलूनमध्ये काम करणाऱ्या इम्रान सलमानीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्या गळ्यावर व कपाळावर ओरखडे दिसले. त्यामुळे संशय बळवला. चौकशीअंती त्याने हत्येची कबुली दिली. वाद झाला आणि गळा दाबून तिची हत्या केली, असे त्यांनी सांगितले. मृतदेह लपविण्यासाठी शीर धडावेगळे करून सुटकेसमध्येभरला, अशीही कबुली त्याने दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.