HW News Marathi
मनोरंजन

इतिहास महाराष्ट्र दिनाचा

महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाला आपण महाराष्ट्र दिन संबोधतो. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०७ हुतात्मांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. १६ जानेवारी १९५६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली होती. परंतु नेहरूंच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली. १६ ते २२ जानेवारी दरम्यान मोठय़ा प्रमाणात दंगे झाले.

राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्यामुळे मराठी माणसांनी चिडून निषेध व्यक्त करायला सुरुवात केली. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रचंड जनसमुदयाने यावेळी राज्य पुनर्रचना आयोगाच्या निषेधार्थ मोर्चा काढला हा मोर्चा पोलिसांनी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज केला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. मुंबईचे तात्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेतले आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. नेहरुंना राज्याला हवे असलेले मुंबई नाव वगळून समितीने महाराष्ट्र असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर ही उपराजधानी म्हणून निश्चित करण्यात आली. त्यानंतर १९६५ मध्ये या चळवळीत प्राण गमावलेल्या हुतात्मांचे स्मरण म्हणून त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची नावे

२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडवीन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नु गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरु

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकरनाशिक

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार) बेळगांव

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी – निपाणी

१०५] कमलाबाई मोहिते

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर – मुंबई

१०७] शंकरराव तोरस्कर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

Aprna

सवाई एकांकिका स्पर्धेत औरंगाबादची ‘मॅट्रिक’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

News Desk

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ‘हाय ग्रेड कॅन्सर’

News Desk