HW News Marathi
मनोरंजन

वसुबारस का साजरी करतात ?

आश्विन कृष्ण द्वादशीला म्हणजेच गोवत्सद्वादशीच्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस या शब्दाचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे या दिवसाला भारतीय संस्कृतीत विषेश महत्व आहे.

वसुबारशीच्या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा केली जाते. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. घरातील सुवासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.

निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विरानुष्का नंतर या सेलिब्रेटी जोडप्याची आहे चर्चा; खान कन्येचं कुणावर आलं दिल ?

swarit

लोपामुद्राने बनविला मातीचा गणपती!

News Desk

अभिनेता सैयद बदरुल हसन खान बहादुर यांचे निधन

News Desk
देश / विदेश

सर्व समस्यांवर ऋषीमुनींचे वेद हाच उपाय!

Gauri Tilekar

नवी दिल्ली | “देशातील दहशतवाद, गुन्हेगारी आणि अनेक समस्या याला एकमेव उपाय म्हणजे फक्त संस्कृतमधील ऋषीमुनींचे वेद हाच आहे. तसेच देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्री यांनी आपल्या हातामध्ये वेद घेऊन शपथ घेतले हे स्वप्न मला पडले असे वक्तव्य केले आहे.” असे केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी दिल्लीमध्ये आज(२६ ऑक्टोबर)ला आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात बोलत होते. सत्यपाल सिंह यांनी भाषण करत असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील उपस्थित होते.

तेव्हढेच नाही तर मंत्री सत्यपाल सिंह यांनी भाषणावेळी वेदांचे महत्त्व सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील जेव्हा पदाची शपथ घेतो तेव्हा तो बायबल हा पवित्र ग्रंथ हातात घेतात, असे उदाहरण दिले.

त्यानंतर राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी म्हटले की, “थंडीत दिल्लीमध्ये प्रदूषणाने श्वास गुदमरतो. दिवाळीसारख्या सणांच्यादरम्यान फटाके न फोडता शांततेत सण साजरा करण्यासाठी सामाजिक संस्थानी जनजागृती निर्माण करावी असा सल्ला राष्ट्रपती यांनी दिला.

 

Related posts

अतिरिक्त चलनसाठ्यावरून आरबीआय-सरकारमध्ये पुन्हा वाद ?

News Desk

धावत्या ट्रेनसोमर सेल्फी घेण्याचा स्टंट फसला

News Desk

रामदास आठवलेंच्या सुरक्षेत वाढ करा

News Desk