HW News Marathi
शिक्षण

सचिन साबू यांना अमेरिकेतील सर्वोच्च बहुमानाचा सन्मान

विनोद तायडे

वाशीम :येथील मंत्री पार्क चे संचालक पवन मंत्री यांचे नातेवाईक जिंतूर तालुक्यातील वरूड येथील मुळचे रहिवाशी सचिन श्यामसुंदर साबू यांना अमेरिकेत नुकताच 60 सदस्यांमधून आरएसएनए या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे वाशीम जिल्हयातही आनंद व्यक्त होत आहे. वरूड या ग्रामीण भागातील सचिन साबू हे लहानपणापासून हुशार विद्यार्थी असल्याने वडिलांनी शिक्षकाच्या सल्याने त्याला उज्वल शैक्षणिक वाटचालीकरीता औरंगाबाद येथे माध्यमिक शिक्षणाचे धडे दिले. स्वताची कार्यक्षमता सिध्द करीत सचिनने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करीत वैद्यकिय क्षेत्रात आपला प्रवेश निश्चीत केला. मुंबई येथील रेडिओलॉजीस्ट रेसीडेन्सी नायर हॉस्पीटल या ठिकाणी उज्वल शिक्षण घेतले. त्यानंतर सचिनला रॉयल कॉलेज लंडन, हारवर्ड विद्यापिठ, युएसए आदि ठिकाणी फेलोशिप मिळाल्या. वैद्यकिय क्षेत्रात आपला ठसा निर्माण करण्याकरीता सचिनने सात वर्षापूर्वी अमेरिकेत स्थायीक होवून विद्यार्थ्यांना वैद्यकिय क्षेत्रातील रेडीओलॉजी हा अभ्यासक्रम शिकवीत असतांना नवनवीन संशोधन सुरू ठेवले आज रेडीओलॉजी सोसायटी नॉर्थ अमेरिका या संस्थेचे ते सदस्य असून या संस्थेत सुमारे 60 हजार रेडीओलॉजिस्ट नोंदणीकृत आहेत. सदर सदस्यांमधून सचिन साबू यांना हा सर्वोच्च बहुमान प्राप्त झाला आहे. या संस्थेने संपूर्ण जगातून केवळ बारा संशोधक डॉक्टरांना उपरोक्त पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबाबत सचिन यांनी वडील शामसुंदर साबू यांच्या प्रोत्साहनामुळेच आपण येथपर्यंत पोहचू शकल्याचे सांगत वडील नेहमी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मी वैद्यकिय क्षेत्रात जावे ही वडीलांची सुरवातीपासूनच इच्छा होती. त्यांनी सदैव आपल्याला आपल्या कार्याला प्रोत्साहन दिले. हा सन्मान परिवार व देशाचा आपण समजत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना येथे सैन्य भरती

News Desk

मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागणार, अभाविपला कुलगुरूंचे आश्वासन

swarit

ठाणे महानगरपालिकेत अधिष्ठाता पदाची जागा

News Desk