HW News Marathi
शिक्षण

बारावी पास असणा-यांना रेल्वेत नोकरीची संधी

नवी दिल्ली: नॉर्थ वेस्टर्न रेल्वे मध्ये १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठीची जाहिरात देण्यात आली आहे. एकूण ७ ते ८ पदांसाठी जागा रिक्त आहेत. एकूण ३०७ जागा भरायच्या असल्याने ही जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. पगार, एकूण पदे, निवड प्रक्रिया आणि नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उमेदवाराने अर्ज करायचा आहे.

कोणती पदे रिक्त-स्टाफ नर्स, क्लार्क, स्टेनोग्राफर, असिस्टंट लोको पायलट, तिकीट तपासक, गुड्स गार्ड, ज्युनियर इंजिनिअर (सिग्नल) आणि इतर

वयाची मयार्दा-१८ वर्षे ते ४२ वर्षे वयाच्या व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता- सरकारी मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थेतून १२ वी पास असणे गरजेचे, डिप्लोमा आणि डिग्री असलेल्यांना प्राधान्य

नोकरीचे ठिकाण-देशभरात कुठेही

अर्ज कसा कराल-इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या वेबसाईटवर क्लिक करून नोकरीसाठीचा आॅनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. तसेच आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी अटेस्टेड करून यासोबत जोडायच्या आहेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख-१२ आॅक्टोबर २०१७

नोंदणी शुल्क-कोणत्याही वगार्साठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क भरायचे नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उज्ज्वल नांदेड” अंतर्गत एमपीएससी टॉपर्सचे ५ जुलै रोजी मार्गदर्शन 

News Desk

नवकलावंतांसाठी जहांगिरमध्ये प्रदर्शनाची संधी

News Desk

तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी करा !

News Desk