HW News Marathi
शिक्षण

बारावीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

सोलापूर | बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका आढळून आली. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासात इंग्रजी पेपर प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. या आश्रमातील काही जणांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आली. परीक्षा हॉलमधून ही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली यांचा खुलासा अजून झाला नाही.

ए, बी आणि सी या तिन्ही सेक्शनच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. परीक्षा कॉपीमुक्त २५२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली असल्याने हा कॉपीचा प्रकार आहे. बोर्डाने तातडीने अहवाल मागवला असून दोषींवर कारवाई केली जाईल. हा पेपर फुटलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरुन जाऊ नये.’ असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच हजार शिक्षक कोर्टात जाणार

News Desk

शाळांना इंटरनेट आणि वायफायने जोडणार,शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

News Desk

उद्या दहावीचा निकाल

News Desk