HW News Marathi
शिक्षण

उद्या दहावीचा निकाल

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच शुक्रवारी ८ जून २०१८ रोजी जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसात सोशल मिडीयावर या निकालाच्या तारखे संदर्भात अनेक अफवा पसरल्या होत्या परंतु अखेर बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहिर करण्यात आली आहे.

बोर्डाच्या https://www.mahresult.nic.in/ या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्या पासून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. तर SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आ0हे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे.

सकाळी ११ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी १ वाजल्या पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदा राज्यातील सुमारे १७ लाख ५१ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

या वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतील

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

News Desk

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk

शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना वाढिव गुण देणार :  राज्य शिक्षण मंडळ  

News Desk