HW News Marathi
शिक्षण

महिला वॉर्डननेच केला विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

मुंबई | एसएनडीटी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील महिला वॉर्डनवर एका विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एसएनडीटी विद्यापीठात तोकडे कपडे परिधान करण्यास मनाई आहे. तरी देखील या विद्यार्थ्यींने हा नियम मोडला म्हणून वॉर्डनने तिला कपडे काढायला सांगितल्याचा आरोप एका विद्यार्थींनीने केला आहे.

या महाविद्यालयातील जवळपास ४०० विद्यार्थिनीने या संपुर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले आहे. या आंदोलनात वॉर्डनला वसतीगृहातून बाहेर काढले जात नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा वसतीगृहातील वद्यार्थिंनी दिला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार विद्यापीठ प्रशासनाने चौकशी करण्यात येईल. चौकशी दरम्यान वॉर्डन दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्यती कारवाई केली जाईल, असे आश्वासन एसएनडीटी महाविद्यालयचे प्रभारी कुलगुरू राजेश वानखेडे यांनी दिले आहे.

नेमके कारण काय

एसएनडीटी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने स्लिवलेस कपडे परिधान केले होते. ही गोष्ट वॉर्डनच्या निदर्शनास आल्यानंतर तिल त्या विद्यार्थ्यिंनीला कपडे काढण्यास सांगितले. कारण एसएनडीटी वसतीगृह मुलींना तोकडे कपडे परिधान करण्यास मनाई आहे. परंतु या विद्यर्थ्यींनीच्या शरीरावर स्किन इन्फेक्शन झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यींने डॉक्टरच्या सल्ल्यामुसार स्लिवलेस कपडे परिधान केले होते. या विद्यार्थिनीने महाविद्यालयाचा नियम मोडला म्हणून वसतिगृहाच्या वार्डने त्या विद्यार्थ्यींनीला तिच्या अंगावरील रॅशेस दाखव म्हणून कपडे काढायला लावले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उज्ज्वल नांदेड” अंतर्गत एमपीएससी टॉपर्सचे ५ जुलै रोजी मार्गदर्शन 

News Desk

उद्यापासून अकरावीचं मिशन अॅडमिशन

News Desk

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk