HW News Marathi
मनोरंजन

..तर संजय दत्त पुन्हा जेलमध्ये

मुंबई: अभिनेता संजय दत्त सध्या जेलमधून बाहेर आहे. बेकायदा शस्र बाळगल्याप्रकरणी त्याने येरवडा कारागृहात शिक्षा पूर्ण केली आहे. परंतु शिक्षेदरम्यान तो जेलमध्ये कमी आणि पॅरोलवर अधिक काळ बाहेर होता. सुमारे १०५ दिवस त्याने शिक्षा असताना जेलबाहेर काढले आहेत. त्याला दिलेली ही सवलत वादाच्या भोवºयात अडकली आहे. एखादा कैदी किती काळ पॅरोलवर बाहेर येऊ शकतो, या विषयी जेल कायद्यात काय नियम आहेत आदी बांबीवर आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संजय दत्त याला मिळालेल्या सवलतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर खुलासा करण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु राज्य सरकारने संजय दत्त याने कायद्याचे पालन केल्याचे म्हटले आहे. गुरुवारी याच विषयावर विधीमंडळात चर्चा करण्यात आली. त्यावेळी मात्र राज्य सरकारने वेगळी भूमिका मांडली. संजय दत्त याला जर सवलत मिळाल्याचे सिद्ध झाले तर त्याला पुन्हा जेलमध्ये धाडण्याची घोषणा या वेळी करण्यात आली. त्यामुळे संजय दत्त याला येरवडा कारागृहात मिळालेल्या विशेष सवलतींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोमसापच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. महेश केळुसकर

News Desk

इतिहास महाराष्ट्र दिनाचा

swarit

Anant Chaturdashi | “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच येणार”

swarit