HW News Marathi
मनोरंजन

सनीला हवाय मुलगाच…

नेटिझन्सची सर्वात आवडती मादक अदाकारासाठी प्रसिद्ध सनी लिओनी लवकरच आई होणार आहे, तसे तिने संकेत दिले आहेत. मूल होण्याचा आनंद केवढा मोठा आहे, असे वक्तव्य करून तिने मुलगाच पाहिजे असेही संकेत दिले आहेत.

एका कार्यक्रमदरम्यान सनीला आई होण्याबाबतचा प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, “अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात घडत असताना फिजीकली मूल जन्माला घालणे कठीण आहे. पण कुणास ठाऊक काही दिवसांनी मी मुलासोबत फिरत असेन आणि प्रत्येकाला धक्का बसेल की हे मूल आले कुठून ?”

सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालणार असल्याचेच यातून सनीला सूचित करायच नव्हते का ?,असा प्रश्न पडतो. शाहरुख खान, तुषार कपूर, करण जोहर ते अगदी कृष्णा अभिषेकपर्यंत अनेकांनी सरोगसीच्या माध्यमातून मुले जन्माला घातली आहेत. त्यामुळे सनीसाठी हा एक मार्ग आहे.

सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या सुखी संसारात मुलाचे आगमन व्हावे अशी त्यांनी इच्छा बाळगणे अतिशय नैसर्गिक आहे. आता हे बाळ कोणत्या माध्यमातून येणार हे काळच ठरवू शकेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

News Desk

नागराज मंजुळे आता मुख्य भूमिकेत दिसणार

Gauri Tilekar

डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

News Desk