HW News Marathi
मनोरंजन

डॉ. अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

यवतमाळ | ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ढेरे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला. जवळपास १७ वर्षांनी संमेलनाच्या अध्यक्षपदी महिलेची करण्यात आली आहे. यवतमाळमधील पोस्टल मैदानावर जानेवारी महिन्यात ११,१२ आणि १३ जानेवारीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची नावे खालीलप्रमाणे

१९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर ही नावे पाठवण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar

नववर्षाच्या स्वागतासाठी मॉलसह हॉटेल २४ तास सुरू ठेवा !

News Desk

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम

News Desk
मुंबई

ताडदेव परिसरातील झोपडीला आग

News Desk

मुंबई | मुंबईच्या ताडदेव परिसरातील मदीना मशिदीजवळ असलेल्या झोपडीला आज आग लागली आहे. या घटनास्थळी ४ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे अद्याप कोणतीही हानी नोंदवली गेलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 

Related posts

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

News Desk

वसई फाटा येथे पुठ्ठ्यांच्या गोदामाला भीषण आग

Gauri Tilekar

विरोधी पक्षांचे सभागृहात ठिय्या आंदोलन, राज्यपालांची घेणार भेट

News Desk