HW News Marathi
राजकारण

माधवन नायर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल (शनिवारी) रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कन्नूरमध्ये झालेल्या सभेत माधवन नायर यांच्यासोबत आणखी चार जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माधवन नायर हे सहा वर्षे इस्रोचे अध्यक्ष राहिले आहेत. माधवन यांच्या कार्यकाळात इस्रोकडून चांद्रयान मोहीम हाती घेण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

EVMHacking : मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो !

News Desk

प्रत्येक मतदारसंघातील व्हीव्हीपॅटच्या ५ मशीनची पडताळणी होणार, सर्वोच्च न्यायालय

News Desk

आदित्य ठाकरेंचा हिरव्या बॅनरवरचा व्हायरल फोटो, नेमकं खरं काय ?

News Desk
राजकारण

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit

बीड | सरकारने राज्यात दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून सर्व माहिती सरकारी फायलीतून मंत्रालयातपर्यंत पोहचविण्याच आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यामध्ये सगळे मंत्री दुष्काळी दौरा करण्यास सुरुवात केली आहे.. राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी रात्री चक्क टॉर्च प्रकाशात पिकांची पाहणी केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागली असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करू अशी घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर पालमंत्र्यांनी त्यांच्या भागातील दौरे करून दुष्काळाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. माजलगावच्या नित्रुड गावात दुष्काळस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर शनिवारी रात्री आले होते. परंतु निलंगेकर यांना नियोजित वेळपेक्षा तब्बल चार तास उशिरा आल्याने अंधार पडला होता. जेव्हा ते गाडीतून उतरले तेव्हा अंधार पडला होता. त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कापसाच्या पिकांची पाहणी केली. अंधारात दिसत नसल्यामुळे टॉर्चच्या उजेडात पिकांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ही पाहणी त्यांनी २० मिनिटांत आटोपल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला


 

Related posts

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या अडचणी सोवडविण्याबाबत मुख्यमंत्र्याचे निर्देश

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महविकासआघाडी सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान

News Desk