HW News Marathi
मनोरंजन

‘काला’ सिनेमा सुपरस्टारचा सुपर शो

चेन्नाई | सुपरस्टार रजनीकांत यांचा बहु प्रतिक्षित असा ‘काला’ हा सिनेमा गुरुवारी रिलिज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृह बाहेर गर्दी केली. गुरुवारी सकाळी चेन्नईच्या रोहिणी सिनेमागृहात पहाटे चार वाजता काला सिनेमाचा पहिला शो पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

रजनीकांतचा जावाई आणि अभिनेता धनुषने या सिनेमाची निर्मिती केली असून दिग्दर्शक पा. रंजित यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. के. एस. राजशेखर यांनी हा सिनेमा रिलिज होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु बुधवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे सिनेमा रिलिज होण्याचा मार्ग मोकळा झाला.

या सिनेमात रजनीकांत यांनी काला ही व्यक्तीरेखा साकारली आहे. यात काला तामिळनाडूवरुन मुंबईत येतो. मुंबईतील धारावी येथे येऊन डॉन बनतो कालाच्या या प्रवासावर आधारित हा सिनेमा आहे. यामध्ये अभिनेते नाना पाटेकर, हुमा कुरेशी आणि सयाजी शिंदे आदी कलाकारांच्या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यशवंत देव यांच्या निधनाने संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले | तावडे

Gauri Tilekar

मराठी बिग बॉस होस्ट करण्याची इच्छा – शिल्पा शिंदे

swarit

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

News Desk