मुंबई | किंग खानच्या ‘झीरो’ सिनेमाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. झीरो हा सिनेमा शुक्रवारी (२१ डिसेंबर) रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात किंग खान शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने अर्धवट कपडे परिधान करून गळ्यात पैशाचा हार घालून त्यावर शीख समुदायाचे पवित्र असे ‘कृपाण’ धारण केला आहे. यामुळे शीख समुदाय नाराज झाला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य हटविण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
Red Chillies: Despite the fact that the film and its poster depicted only an ornamental dagger and not a 'Kirpan', steps have been taken by the respondent to alter the relevant scenes. The portions in question have been altered through visual effects to depict an ornamental sword https://t.co/xgmHdw3vbP
— ANI (@ANI) December 19, 2018
शाहरुखने कृपाण धारण केल्याचे दृश्य वगळल्याची माहिती सिनेमाच्या निर्मात्यांनी न्यायालयात दिली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी ‘झिरो’ हा चित्रपट कोणत्याही अडथळ्यांविना प्रदर्शित होऊ शकतो. नवी दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत कृपाणचा वापर केला आहे. मात्र, या पोस्टरमुळे शीख समुदायांच्या भावना दुखविल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.