HW News Marathi
मनोरंजन

इरफानच्या बांगलादेशी सिनेमाची ऑस्करसाठी निवड

नवी दिल्ली | आपल्या दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता इरफान खान याने काम केलेल्या बांगलादेशी चित्रपटाची ऑस्‍कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावर्षी ‘दूब: नो बेड ऑफ रोजेज’ हा चित्रपट बांगलादेशकडून ऑस्‍कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता. ऑस्‍कर पुरस्कारासाठी ‘उत्कृष्ट परदेशी भाषा प्रकारासाठी ‘दूब: नो बेड ऑफ रोजेज’ या चित्रपटाची निवड झाली आहे. ‘दूब: नो बेड ऑफ रोजेज’ हा चित्रपट इम्रान खान यांच्या अत्यंत नैसर्गिक अशा अभिनयाने परिपूर्ण आहेच पण त्यासोबतच त्याने या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे.

कोलकातामध्ये देखील काही ठिकाणी हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. मुस्‍तफा सरवर फारूकी यांनी ‘दूब: नो बेड ऑफ रोजेज’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट बांगलादेशी लेखक आणि दिग्दर्शक हुमायूं अहमद यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप चित्रपटाच्या दिगदर्शकानी कोणताही खुलासा केलेला नाही.काही दिवसांपूर्वी या सिनेमावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही दिवसानंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

swarit

#HappyBirthdayLataDi |… या सिनेमातून गाळली लता दीदींची गाणी

swarit

माधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट

News Desk
संपादकीय

कॉंग्रेसचा मुंबई अध्यक्ष मराठी व्यक्तीच का नाही ?

News Desk

मुंबई | मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांना हटवावे म्हणून पक्षाच्या नेत्यांनी राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची अलिकडे काही दिवसांपुर्वी भेट घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील हा वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला. १९८१ साली मुरली देवरा यांनी मुंबई अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यापासून मुंबई काँग्रेसमध्ये वादाची परंपरा कायम राहीलेली पहायला मिळते. तब्बल २२ वर्षे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपद भुषवलेले मुर्ली देवरा देखील मुंबई अध्यक्षपदावरुन वादाच्या भौव-यात अडकले होते.

मुंबई काँग्रेसमध्ये अध्यक्षांच्या विरोधात अन्य नेत्यांनी एकत्र येण्याची परंपरा इतक्या वर्षांनंतर आजही कायम असल्याचे दिसून येते. मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसचे २२ वर्षे अध्यक्ष होते. १९८५ मध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि शिवसेना सत्तेत आली होती. तेव्हा देवरा यांना हटविण्याची मागणी झाली होती. देवरा यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पक्षांतर्गत नेत्यांना तेव्हा चोप देण्यात आला होता. कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा पदभार अद्याप जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रातील नेत्यांना बगल देऊन परप्रांतीय नेत्यांना दिल्याचे पहायला मिळते .

 

मुंबई अध्यक्ष मराठी व्यक्तीच का नाही ?

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी नंतर १ मे १९६० रोजी मुंबईला महाराष्ट्राचा भाग म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राची अर्थिक राजधानी म्हणून घोषित केली गेली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबईला अनन्य साधारण महत्व दिले गेले. मुंबई ही मराठी माणसाच्या अस्मितेचा चेहरा होती. आजही महाराष्ट्रात असलेल्या सर्व पक्षांचे मुंबई अध्यक्ष हे प्राध्यान्याने मराठी व्यक्ती असल्याचे पहायला मिळते. परंतु कॉंग्रेस पक्ष याला नेहमीच अपवाद ठरला आहे.

कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्षपद हे जास्तीत जास्त अमराठी व्यक्तींनी भुषविले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात असूनही मराठी माणसाचे प्रतिनिधीत्व परप्रांतीय अध्यक्षाचे हाती का दिले जाते. हि बाब संभ्रम निर्माण करणारी आहे. इतर राज्यांमध्ये मात्र प्रादेशिक नेत्यांना त्या त्या शहरांची अध्यपदे दिली जातात. मुंबईत मात्र हे चित्र उलट असल्याचे दिसते. इतर पक्षांमध्ये पाहिले तर तुलनात्मक दृष्ट्या ही परिस्थिती वेगळी असल्याचे पहायला मिळते.

एकीकडे केवळ मराठी अस्मितेसाठी राजकारण करणारे २ राजकीय पक्ष मुंबई सारख्या शहरात सक्रीय आहेत. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या कॉंग्रेस पक्षाला एक मुंबई अध्यक्ष म्हणून मराठी व्यक्ती योग्यतेचा वाटत नसेल तर कॉंग्रेसमध्ये असणा-या मराठी चेह-यांचा हा धडधडीत अपमानच म्हणावा लागेल.

कॉंग्रेस पक्षाचा इतिहास पाहिला तर अगदी बोटावर मोजण्याइतक्याच मराठी नेत्यांना मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला मिळाली. मोजके नेते वगळता परप्रांतीय नेत्यांनीच आजपर्यंत मुंबई अध्यक्षपद सांभाळले आहे. मुंबईमध्ये कॉंग्रेस रुजवणारा गुरुदास कामत हा एक मराठी चेहरा होता याचा सध्या कॉंग्रेसला कुठेतरी विसर पडल्याचे चित्र आहे.

Related posts

मी मराठी

swarit

विरोधकांनी प्रभावी नेतृत्व दिल्यास भारत सत्ता बदलास इच्छूक | HW न्यूज सर्वेक्षण

swarit

आशियाचा नोबेल ‘मॅगसेसे पुरस्कार’

swarit