मुंबई | मीटूच्या मोहिमे मुळे “सेक्रेड गेम्स २” या सिरीजचे काम खोळंबण्याचा धोका आहे. अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्या भूमिका असलेली नेटफ्लिक्सची “सेक्रेड गेम्स” प्रचंड गाजला. हि वेब सिरीज नुकतीच मागील महिन्यात संपली. या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. पण आता चाहत्यांना नाराज करणारी एक बातमी समोर आली आहे.
मीटूच्या मोहिमेमुळे सेक्रेड गेम्स २ वर परिणाम होण्याची शक्यता आहे. मीटू चळवळीने वरूण ग्रोव्हरवर गैरवर्तनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. वरुण ग्रोव्हर “सेक्रेड गेम्स २” या सिरींजचा सहलेखक आहे. या गैरवर्तनाच्या आरोपानंतर वरूनच्या ऐवजी आता नेयफ्लिक्स दुसरा पर्याय शोधत आहेत. मी टूच्या मोहिमेअंतर्गत वरुण वरील आरोपांमुळे सेक्रेड गेम्स २ वर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे सीरिजच्या श्रेयातून वरुण ग्रोव्हरचे नाव वगळण्याचा प्रयत्न करत आहेत. वरुण सिरीजमधुन पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत योग्य पर्याय मिळाला नाही तर सेक्रेड गेम्सचे काम खोळंबण्याचा धोका आहे . येत्या काही दिवसांत यावर काय तोडगा निघेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.