HW News Marathi
मनोरंजन

आसमान से आया फ़रिश्ता

शम्मी कपूर हे नाव घेतले की आठवते ते म्हणजे त्यांची किंकाळी “याssssss हूsssss”. शम्मी कपूर यांचा आज वाढदिवस आहे. शम्मी कपूर यांचा जन्म १९३१ साली मुंबईमध्ये झाला. शम्मी कपूर यांचे पूर्ण नाव शमशेर पृथ्वीराज कपूर असे आहे. नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृध्वीराज कपूर हे शम्मी कपूर यांचे वडील होते. शम्मी कपूर सह त्यांना तीन भावंडे होती. तीनही भावंडांनी आपल्या वडिलांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले. शम्मी कपूर भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणले जातात. ते इंटरनेट यूझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) या संस्थेचे संस्थापक चालक होते. एथिकल हॅकर्स असोशिएशन यांसारख्या इंटरनेट संस्थांमध्ये कार्यरत होते.

शम्मीने अभिनयाची सुरूवात गंभीर भूमिकांपासूनच केली. शम्मी कपूर यांनी १९५३ साली चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. जीवन ज्योती हा त्यांचा पहिला सिनेमा होता. शम्मीने अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. शम्मी कपूर यांचे लग्न गीता बालीशी झाले. थोड्याच वर्षात गीता बाली यांचे निधन झाले. त्यांनतर त्यांनी नीला देवी यांच्याशी केला. शम्मी कूपर यांना आदित्य कूपर आणि कांचन ही दोन अपत्ये आहेत. ७ ऑगस्ट इ.स. २०११ रोजी शम्मी कपूर यांचे मुंबईत निधन झाले.

शम्मी कपूर यांना अनेक पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले.

इ.स. १९६२ – फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारसाठी नामांकन प्राध्यापक

इ.स. १९६८ – फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार ब्रम्हचारी

इ.स. १९८२ – फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार विधाता

इ.स. १९९५ – फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार

इ.स. १९९८ – कलाकार पुरस्कार

इ.स. १९९९ – झी सिने अ‍ॅवॉर्ड फ़ॉर लाइफटाइम अचीवमेंट

इ.स. २००१ – स्टार स्क्रीन लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड

इ.स. २००२ – इनव्हॅल्युएबल काँट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा – IIFA कडून

इ.स. २००५ – लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड – बॉलिवुड मूव्ही अ‍ॅवॉर्ड्‌स्‌ तर्फे

इ.स. २००८ – लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड – भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये

भारतीय मनोरंजन उद्योगाला दिलेल्या बहुमोल योगदानासाठी शम्मी कपूर हे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (फिक्की)च्या ‘लिव्हिंग लेजेंड अ‍ॅवॉर्ड’ने पुरस्कृत केले होते.

नासिर हुसेन – दिग्दर्शित तुमसा नही देखा आणि दिल देके देखो या चित्रपटांनंतर शम्मीची एका खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली. शम्मी कपूर यांनी यांच्या करिअरची सुरुवात जीवन ज्योति या सिनेमाने केली. त्यानंतर रेल का डिब्बा (१९५३), शमा परवाना (१९५४), टांगेवाल (१९५५), सिपाहसलार (१९५६), तुमसा नही देखा (१९५७),अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस (१९६७)अश्या असंख्य चित्रपटांमधून शम्मी कपूर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या एसटी बसला आग, प्रवासी थोडक्यात बचावले

News Desk

गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांनी रत्नागिरी पॅसेंजर रोखली

swarit

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाच्या दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांना अटक

swarit