HW News Marathi
मनोरंजन

‘ठाकरे’च्या सिनेमाचे आज ट्रेलर लाँच

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ या सिनेमाचा आज (२६ डिसेंबर) दुपारी ट्रेलर लाँच होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच कार्निव्हल आयमॅक्स वडाळा येथे प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर लाँच झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु या चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.

अभिजीत पानसरे दिग्दर्शित आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांचा ‘ठाकरे’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झालेला पाहून रसिकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. परंतु हा सिनेमा वादात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार की नाही, याबाबत निश्चित सांगता येत नव्हते. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्रेलर नियोजित वेळेनुसारच लाँच होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी, शिवसेना नेते सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया आणि संबंधित बाबींची पूर्तता करत असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाकरे सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. परंतु या सिनेमाचा टीझरमधूनच बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले. हुबेहूब बाळासाहेबांची शैली साकारत नवाजुद्दीनने साऱ्यांची मने जिंकली आहेत. बाळासाहेबांसोबतच उद्धव, राज, मीनाताई ठाकरे, मनोहर जोशी, शरद पवार यांच्या भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी रसिक आतुर आहेत. मात्र, यातील काही बाबी आजच्या ट्रेलरमधून स्पष्ट होतील, असा अंदाज आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी आयपीएलमध्ये सट्टा लावला | अरबाज खान

News Desk

अनुभव घ्या कथ्थक कलेमधून भारताच्या वैभवशाली अभंगाचा

News Desk

गेटवेवर नौसेना दिनाची रंगीत तालीम, पहा नौसेनेची थरारक प्रात्यक्षिकं

News Desk