HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

युतीची तुमच्याप्रमाणे मलाही चिंता, योग्य वेळी निर्णय घोषित करू !

मुंबई | “युतीची तुमच्या प्रमाणे मलाही चिंता आहे, योग्य वेळी निर्णय घोषित करू, ” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात सस्पेन्स कायम ठेवला. मुख्यमंत्र्यांनी आज (२३ सप्टेंबर) मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेऊ, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (२२ सप्टेंबर) मुंबईत झालेल्या सभेत युतीच्या विषयाबद्दल बोलणे टाळले. शहा २६ सप्टेंबरला पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये युतीसंदर्भात पक्षश्रेष्ठींची चर्चा करून शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा तिढा सोडवला जाणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याचा फायदा

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, कॉर्पोरेट टॅक्स २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घोषित केला. या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. जागतिक स्थितीचा परिणाम भारतावर होऊ नये, ट्रेड वॉरचा फायदा भारताला मिळावा यासाठी केलेल्या केंद्राने उचलेले हे पाऊल महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अमेरिकेत आणि चीनमध्ये चाललेल्या ट्रेड वॉरमुळे ज्या कंपनी स्थलांतरित होत आहेत. त्या भारतात येण्याची शक्यता आहे. मात्र, या कंपन्या भारतात येण्यासाठी ३० टक्के कॉर्पोरेट टॅक्सचा अडसर होता तो दूर झाला. ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करणे गरजेचे आहे असं अनेक अर्थतज्ज्ञ सांगतात. भारताने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असं सांगून त्यांनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे माजी मंत्री-खासदार विधानसभा निवडणूक लढविणार ?

News Desk

मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही !

News Desk

शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये राहणार ?

News Desk