HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेसचे माजी मंत्री-खासदार विधानसभा निवडणूक लढविणार ?

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला गळती लागली आहे. निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यामुळे काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदारांना मैदानात उतरविण्याचे आदेश दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप-शिवसेनेचे आव्हान रोखण्यासाठी काँग्रेसची ही रणनीती आखली आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री-खासदार विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील प्रमुख मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. मात्री, यात त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस देखील राष्ट्रवादींची ही रणनीती वापरण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना कळात.

राष्ट्रवादीसारखी हालत होऊ नये, म्हणून काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पहिल्यापासून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. हायकमांडमुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारुण परभाव झाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आज शिवसेनेत करणार प्रवेश

News Desk

पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

News Desk