मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केले आहेत. यात आत राष्ट्रवादीच्या अजून एका दिग्ग्ज नत्यांची भर पडणार आहे. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आज (२८ ऑगस्ट) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Maharashtra: Nationalist Congress Party (NCP) MLA from Barshi constituency of Solapur district, Dilip Sopal (in file pic) handed over his resignation to Maharashtra Assembly Speaker Haribhau Bagde, yesterday. pic.twitter.com/hcP2mNxe3G
— ANI (@ANI) August 28, 2019
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सोपल यांचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश होणार असल्याची घोषणा त्यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) सोपल यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. यानंतर दिलिप सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, आणि मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखले जाते. आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रीपदांवर काम केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.