इंदापूर। काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (४ सप्टेंबर) दुपारी १ वाजता कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेशाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र, पाटील ७ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेस आघाडीच्या राजकारणाला कंटाळून हर्षवर्धन पाटील भाजपत जाणार असल्याचे बोलले जात आहे.
तसेच येत्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादीकडून इंदापूरच्या जागेवर हक्क सांगण्यात येत आहे. त्यामुळे इंदापूरची जागा काँग्रेसला नाही मिळाली, तर हर्षवर्धन पाटील भाजपत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाटील यांनी भाजपच्या तिकीटावर इंदापूरच्या जागेवर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (७ सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी औरंगाबादमधील कार्यक्रमात मोदींच्या उपस्थितीत पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हर्षवर्धन पाटील हे सलग ४ वेळा इंदापूरच्या जागेवरून निवडून आले आहेत. परंतु, २०१४ साली झालेल्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभेसाठी देखील राष्ट्रवादीकडून इंदापूर मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील आता काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.