HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

अमित शहांच्या उपस्थितीत मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (१ सप्टेंबर) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक आणि साताऱ्याचे काँग्रेसचे माजी आमदार जयकुमार गोरे यांनी आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या या दुसऱ्या मेगाभरतीची जोरदार चर्चा होती. दरम्यान, आज झालेल्या या दुसऱ्या मेगाभरतीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का बसला आहे. सोलापूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप झाला आहे. त्यानंतर सोलापुरात भाजपकडून रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. भाजपच्या या शक्तिप्रदर्शनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या २ आणि काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Related posts

BJP megabharti | भाजपची मेगाभरती ..

News Desk

शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये राहणार ?

News Desk

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो !

News Desk