HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

महाजनादेश यात्रेची सांगता, अमित शहांच्या उपस्थित भाजपमध्ये होणार मेगा भरती

सोलापूर | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दिग्गज नेते आज (१ सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सोलापूरमध्ये आज महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती आज भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगा भरती होणार आहे. सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भाजप भरतीचा सोहळा पार पडणार आहे.

उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि त्यांचे वडील पद्मसिंह पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आमदार बबन शिंदे, जयकुमार गोरे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, रामराजे नाईक यांचाही भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. अखेर उदयनराजे ५ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळणाऱ्यांची चिंता करू नका, उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या !

News Desk

पक्षामध्ये घेण्यापूर्वी आम्ही त्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो | दानवे

News Desk

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक, येत्या ५ सप्टेंबरला उमदेवारांची यादी तयार होणार

News Desk