HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो !

सोमेश्वरनगर | ‘अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग, त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो,’ असे म्हणत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन  पाटील टीका केली आहे. पवार पुढे म्हणाले, ‘हर्षवर्धन पाटील केलेल सर्व खोटे आरोप असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल’, असा शब्द दिला होता.

सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विज्ञान महाविद्यालय मुलींच्या वसतिगृह भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘आम्ही हर्षवर्धन पाटील यांना ५० ते ५५ फोन केले पण ते भेटले नाहीत. सांगायला काही नाही म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत,’ मी त्यांना कित्तेक वेळा त्यांना पुण्याच्या घरी भेटायला गेलो. पण, सध्या ते फक्त पावती फेडायचे काम करत आहेत.

पवार म्हणाले, लोकांना भावनिक बनवले जातेय. काहींना भीती दाखवून तर काहींना नोटिसा पाठवून पक्षात घेतले जातेय. त्यांना सत्तेचा माज, सत्तेची नशा चढली आहे. ईडीच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलायचे कमी झाले, असे सांगत पवारांनी ठाकरेंवर टीका केली. सत्तधारी पक्ष पवारांना पैशांची आणि विविध चौकशांची भीती दाखवत आहेत.

Related posts

शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही, पुढे कसे जाणार ?

News Desk

शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट ?

News Desk

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावरच होणार !

News Desk