HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील यांची नियुक्ती

कोल्हापूर | माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. प्रदेश काँग्रेसकडून काल (७ सप्टेंबर) जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांसाठी सुरेश कुराडे किंवा गुलाबराव घोरपडे यांच्याकडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबादारी देण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कायमस्वरुपी जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरुन सतेज पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पत्र सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी जाहीर केले आहे. प्रकाश आवाडे यांच्याकडे सात महिन्यासाठी कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपद सांभाळले.

आमदार सतेज पाटील हे तरुण असून त्यांच्याकडे भक्कम यंत्रणा आहे. निवडणुकीत उमेदवारांना त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय ते विधानसभा निवडणूकही लढवणार नसल्याने या कामासाठी वेळही देऊ शकतात. या सर्वांचा विचार होऊन त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी आज महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिकात

News Desk

संभाजी भिडेंनी घेतली उदयनराजेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

…तोपर्यंत शिवसेनेबरोबर युती करणार नाही !

News Desk