HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही !

मुंबई | काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पाटील यांनी आज (११ सप्टेंबर) भाजपची  मुंबईतील गरवारे क्लब दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ‘मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही,’ असे हर्षवर्धन पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पाटील यांनी कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. त्यावेळी पाटील बोलताना म्हणाले की, आता अन्याय सहन करणार नाही, असे म्हणत भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. इंदापूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत तिढा निर्माण झाला होता. तर ही जागा राष्ट्रवादी आपल्याकडेचे ठेवणार अशी दाट शक्यता होती. यामुळे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे राजकीय वर्तुळात बोले जाते.

नेमके काय म्हणाले हर्षवर्धन पाटील

 • आजचा ऐतिहासिक दिवस असून आज मी भारतीय जनता पक्षात मी प्रवेश करतो.
 • मुख्यमंत्री यांनी कणखरपणे नेतृत्व केले आहे.
 • दुष्काळ आणि पूर यात तुम्ही चांगले काम केले आहे.
 • १९५२ पासून आमी एका राजकीय विचारातून वाढलेली लोक आहोत.
 • आम्ही कधी तत्व सोडली नाहीत, आणि तत्व सोडायची नसतील तर भाजप शिवाय पर्याय नाही.
 • केंद्रातील सरकारला १०० दिवस झाले, यात सरकारने धाडसी निर्णय घेतले. म्हणून आम्ही तुमच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला.
 • मुख्यमंत्री यांच्या सोबत मी काम केले आहे. ते विरोधात असताना देखील सहकार्याची भूमिका घेतली
 • मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही
 • मुख्यमंत्री यांचा चेहरा हसरा आहे आणि आता तो जास्त हसरा होईल कारण आता हर्षवर्धन त्यांच्या सोबत आले आहेत.
 • मुखमंत्री यांनी कोणतीही जबाबदारी मला दिली ती मी पूर्ण करेल.
 • अजूनही लोक भाजपत येणार आहेत, लोकांचा कल भाजपकडे आहे.
 • माझा मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती माहीत आहे. आमच्या भागात पाण्याचा प्रश्न आहे हो तुम्ही मार्गी लावाल हे माहीत आहे.

 

Related posts

बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही !

News Desk

जेव्हा शरद पवार म्हणतात, तुला पण राजेंनी पगडी घातली का रे ?

News Desk

शिवसेना कोणाच्याही बापाची मक्तेदारी नाही !

News Desk