HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय, जम्मू-काश्मीमध्ये एमटीडीसी उभारणार दोन रिसॉर्ट

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आज (३ सप्टेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने जम्मू-काश्मीमध्ये एमटीडीसीची दोन रिसॉर्ट उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती आणि आदिवासींसाठी उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांसारखे निर्णय घेतले गेले.

गणेशोत्सवानंतर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वीच राज्य सरकारांनी मंत्रिमंडळाता निर्णयाचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीचं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल पंचवीस निर्णय घेण्यात आले. विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना २० टक्के अनुदान, नाशिक मेट्रो प्रकल्पाला ग्रीन सिग्नल, मुंबईतल्या जीर्ण इमारतींचा पुनर्विकास, यासोबतच आणखी बऱ्याच महत्त्वाच्या आणि लोकप्रिय विषयांबंबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आले.

राज्य सरकारने मंत्री मंडळात घेतलेले निर्णय

  • जम्मू काश्मीरमध्ये एमटीडीसी दोन रिसॉर्ट उभे करणार
  • अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करणार.
  • आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी २५४ अतिरिक्त विज्ञान शिक्षक नियुक्त करण्यास मंजुरी.
  • भिलार येथील पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता स्वतंत्र योजना म्हणून सुरू राहणार.
  • लोकायुक्त कार्यालयासाठी उप प्रबंधक पद निर्माण करण्यास मान्यता.
  • गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी परताव्याच्या अधीन राहून देण्यात आलेली ६१ कोटी रक्कम अनुदानात रुपांतरित करण्यास मान्यता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Patil Vs NCP | ‘मिसळीचा ठसका’ राष्ट्रवादीला लागला ..

News Desk

बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे !

swarit

Vaibhav Pichad BJP | शरद पवारांचा आयुष्यभर ऋणी राहिन..

News Desk