HW News Marathi
महाराष्ट्र

आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना पोलिस अधिकाऱ्याची मदत

 

स्पेशल स्टोरी

उत्तम बाबळे

नांदेड :- विशेष पोलीस पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी येथील अवैध धंद्यांना लगाम घालून जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. हे कर्तव्य बजावत असताना त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. काही दिवसांपूर्वी शहीद जवानांच्या कुटूंबीयांच्या मदतीसाठी त्यांनी आपले एक महिन्याचे वेतन दिले होते. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास दाद देत एक महिन्याचे पूर्ण वेतन आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांच्या मदतीसाठी दिले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत त्यांच्या पगाराची रक्कम जमा केली आहे.

चिंचोळकर यांनी पोलिस म्हणून कर्तव्य बजावताना वेगळा ठसा उमटवला आहे, तसेच एक संवेदनशील माणूस म्हणून ते कायम वावरत असतात. शेती व मातीशी चिंचोलकर यांची नाळ घट्ट आहे. २९ नोव्हेंबर २०१६ रोजी जवान संभाजी कदम हे शहीद झाले. या शहीद जवानाच्या कुटूंबीयांच्या मदतीसाठी त्यावेळी आपला एक महिन्याचा संपुर्ण पगार दिला. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.११ जुलै २०१७ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देणगी म्हणून आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांच्या मदतीसाठी द्यावे असा आदेश काढले. या आवाहनास ओमकात चिंचोळकर यांनी दाद दिली व त्यांचा जुलै २०१७ चा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात यावा, असे संम्मती पत्र दिले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. चिंचोळकर प्रमाणे पोलिस विभागातील इतर अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवल्यास, पोलिसांची जनमानसातील प्रतिमा नक्कीच उंचावेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | “आमच्या मुलीला ‘हा’ स्ट्रेस होता”, पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही | विखे-पाटील

News Desk

फडणवीस एकही बॉल सीमेपार टोलवू शकले नाहीत, मुश्रीफांचा टोला

News Desk