HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार उदयनराजे यांना अटक

साता-यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे.उदयनराजे यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. मुंबई उच्च न्यायालयात उदयनराजे यांनी अटकपुर्व जामीनसाठी अर्ज केले होते, मात्र कोर्टाने हे अर्ज फेटाऴला होता.अखेर आज सकाळी उदयनराजे कार्यकर्त्यांसह सातारा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजे यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु तिथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी पाहिल्यानंतर शासकीय विश्रामगृहातच त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.इथेच अटकेची कागदोपत्री पूर्ण प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर उदयनराजेंना न्यायालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपचे वर्चस्व; महाविकासआघाडीला धक्का

Aprna

भाजप हा उन्मादी पक्ष, जयसिंगराव गायकवाडांचा गंभीर आरोप

News Desk

डॉ. पायल तडवी प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk