HW News Marathi
महाराष्ट्र

पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी गायकवाडला सशर्त जामीन

कोल्हापूर – काँम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी संशयित आरोपी आणि सनातन संस्थेच्या पूर्णवेळ साधक असलेल्या समीर गायकवाडला जिल्हा सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. आज गायकवाडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्याला सशर्त जामीन मंजूर केला. या सशर्त जामीनामध्ये गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यावर बंदी आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायला बंदी करण्यात आली आहे.

जामीनावर असतांना गायकवाड याला त्याच्या निवासाचा पत्ता देणं न्यायालयानं बंधनकारक केलंय. तर दर रविवारी त्याला तपास यंत्रणांकडे हजेरी लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शिवाय गायकवाडचा पासपोर्टही न्यायालयाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं समीर गायकवाडला १६ सप्टेंबर २०१५ ला अटक केली होती. त्याच्या जामीनावर याआधी चारवेळा सुनावणी झाली. शनिवारी सकाळी न्यायालयानं त्याचा निकाल दिला. गायकवाड याची २५ हजाराच्या जातमुचलक्यावर तूर्तास सुटका करण्यात आली. मात्र, हे करताना न्यायालयानं त्याच्यावर कांही निर्बंध घातले. त्यामध्ये गायकवाडला दर रविवारी ११ ते १ वाजता विशेष तपास पथकाच्या कोल्हापुरातील कार्यालयामध्ये येऊन हजेरी द्यावी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात त्यास इतरत्र कुठेही प्रवेश करता येणार नाही. साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालय त्याची गंभीर दखल घेईल. गायकवाडचा पासपोर्ट न्यायालयाकडं जमा करावा लागेल व बाहेर कुठेही जायचे असेल तर तो कुठे जाणार आहे, तिथे कुणाकडे राहणार आहे हे कळविणे बंधनकारक असेल. आपल्या वर्तनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पैठणच्या सभेवरुन वरुण सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले…

Darrell Miranda

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल

News Desk