HW News Marathi
महाराष्ट्र

तेजस ठाकरेंनी लावला खेकड्यांच्या ११ नवीन प्रजातींचा शोध

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे याने आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा नव्याने शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून तेजस यांनी ११ दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला आहे. तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या काही प्रजातींचा शोध लावला होता.

न्यूझीलंड येथील ‘झुटाक्सा’ या नियतकालिकात आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचे दुर्मिळ खेकड्यांविषयी दुसरं संशोधन प्रसिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील ‘सह्याद्री’ या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचे ‘सह्याद्रियाना’ असे नामकरण करण्यात आले आहे.

या शोधासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे तेजस यांनी आभार मानले आहेत. डोंगरदऱ्या, जंगलामध्ये फिरण्याची परवानगी, शोधमोहिमेसाठी लागणारे साहित्य अशी सर्वप्रकारची मदत त्यांना वन विभागाने केली. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दुर्मिळ खेकड्यांच्या शोधामुळे वन्य जीव संपत्ती जतन करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून त्याचे संवर्धन अत्यंत गरजेचे असल्याची प्रतिक्रिया तेजस ठाकरे यांनी व्यक्त केली.

खेकड्याच्या दुर्मिळ ११ प्रजाती कोणत्या?

  • घाटियाना बोट्टी
  • घाटियाना पल्च्रा
  • घाटियाना रथब्युने
  • गुबेरनाटोरियाना लाँगीपेस
  • गुबेरनाटोरियाना मार्लेश्वरेनेसीस
  • गुबेरनाटोरियाना वालासेई
  • सह्याद्रियाना बिल्यारजानी
  • सह्याद्रियाना पाछेपालूस
  • सह्याद्रियाना सह्याद्रीनेसीस
  • सह्याद्रियाना टेन्यूफालस
  • सह्याद्रियाना वुडसासोनी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

News Desk

स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार?

News Desk

महाविकासआघाडीला १०० दिवस पूर्ण, ठाकरे सरकारने घेतलेले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

swarit