HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे मनपावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागा !

पुणे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुणे महापालिकेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायला हवा यासाठी कामाला लागा, असा आदेशच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय. पुण्यातल्या म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या हस्ते आज (७ जुलै) करण्यात आलं. त्यावेळी राऊत बोलत होते. राज्यात महाविकास आघाडी आहे. मग महापालिकेवर ही महाविकास आघाडी आणायला हवी, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावलाय

ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काहीही हातातून सोडू नका !

महाराष्ट्रात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरलाय. राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्ला संजय राऊत यांनी पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय. महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काहीही हातातून सोडू नका, असंही राऊत म्हणाले.संजय राऊत कार्यक्रमाला पोहोचले आणि बोलायला उभे राहिले तोपर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमस्थळी आले नाही. त्यावेळी बोलताना राऊतांनी महापौरांना टोला लगावला. महापौर अजून आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय. महापौरांनी सगळीकडे जायला हवं. महापौरांना वाटतं की राज्य आपल्या हातात आलं आहे. ते त्यांना सोडायचं नाही, अशा शब्दात राऊतांनी मोहोळ यांना टोला लगावला.

शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करतेय !

आम्ही महाविकास आघाडी बनवू, याबाबत वाटाघाटी करु, एकत्र बसून चर्चा करु, असंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत आम्ही ८० जागा लढवू शकत नाही का? असंही राऊत म्हणाले. यापूर्वीही राऊत यांनी आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, असं राऊत म्हणाले होते. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.

मी पुन्हा येईन….!

संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रह फडणवीस यांच्या गाजलेल्या वक्तव्याचा आधार घेतला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. मी पुन्हा येईल. मी दिल्लीत असलो तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईन, असं संजय राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थित लोक खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळालं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवले, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Aprna

“दर महिन्याला त्यांच्या पदरामध्ये वेळेत ते वेतन पडलं पाहिजे”, शरद पवारांचा “तो” व्हिडिओ व्हायरल

News Desk

“सरकारमध्ये बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?”

News Desk