HW News Marathi
महाराष्ट्र

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय! गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची कोठडी

मुंबई | वकिल गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने आज (१८ एप्रिल) सदावर्तेंनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुनावणी झाली. सदावर्तेंनी एका टिव्ही न्यूज चॅनला दिलेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदावर्तेंच्या वक्तव्यावर राज्यभरात विरोध दर्शविला होता. या वक्तव्यविरोधात साताऱ्यात राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे. या प्रकरणी सदावर्तेंविरोधात २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी सदावर्तेंना गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण सुरु असतानाच सदावर्तेंना सातारा पोलिसांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सातारामध्ये सदावर्तेंवर दीड वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणी त्यांना मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातून १४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे. यानंतर पोलीस साताऱ्यात घेऊन केले. 

Related posts

रोहित पवारांनी उपस्थित केला भाजपच्या संस्कारांवर प्रश्न!

News Desk

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार

News Desk

“पार्थ मनाने खूप चांगला पण निर्णय घेताना कधीकधी अचानक…”

News Desk