HW News Marathi
महाराष्ट्र

‘चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची भेट,’ राजकीय चर्चांना उधाण!

नाशिक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही सध्या नाशिकमध्ये आपल्या दौऱ्यासाठी गेले आहेत. राज ठाकरेंचा हा तीन दिवसीय दौरा असून ते नाशिकमधल्या शासकीय विश्रामगृहात राहणार आहेत आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही याच विश्रामगृहात आहेत. आता या दोघांमध्ये भाजपा-मनसे युतीबद्दल चर्चा होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच केलं होतं.

दोघांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच होता

राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांत सकाळी 10 ते 15 मिनिटे भेट झाली. दोन्ही नेते 3 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दाखल झाले होते. दोघांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच होता, त्यामुळे शुक्रवार पासूनच या दोघांच्या भेटीची शक्यता व्यक्त होत होती, अखेर रविवारी (१८जुलै) सकाळी भेट झाली. मनसे आणि भाजप यांची नाशिक महापालिकामध्ये 2012 ते 2017 या पंचवार्षिक ला सत्ता होती. यानंतर भाजपने बहुमताचा आकडा गाठला तर मनसे ची सदस्य संख्या 40 वरून 5 वर आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यानं मनपा निवडणुकीत भाजपला तिन्ही पक्षांकडून लक्ष्य केले जाणार आहे. त्यामुळे आहे ती सत्ता राखण्यासाठी भाजप आणि गेलेली सत्ता पुनः प्राप्त करण्यासाठी मनसे कामाला लागली आहे.

भेट अनौपचारिक होती जुनी मैत्री आहे

दोन्ही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वन टू वन चर्चा करून सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. दोन्ही पक्षांना मनपा निवडणुकीत एकमेकांची गरज लागण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. चंद्रकांत पाटील यांनी भेट अनौपचारिक होती जुनी मैत्री आहे असे सांगत चर्चेचा विषय सांगितला नसला तरी नव्या समिकरणांची पायाभरणी म्हणून या भेटीकडे बघितले जात आहे. जुनी मैत्री मनपा निवडणुकीच्या राजकारणात ही दिसणार का येत्या काळात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागलय.

परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही तोवर..

पाटील यांनी कालच मनसेशी युती करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत युती शक्य नाही, असं ते म्हणाले होते. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जीवावर सत्ता येणार नाही. आमचा जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

विद्यार्थी चळवळीत होतो तेंव्हापासूनची आमची मैत्री

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता?, असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज झाली. तासभर भेटलंच पाहिजे, असं काही नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा पक्ष जातीयवादी नाही- जयंत पाटील

swarit

Maharashtra Budget 2021-22 : पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार

News Desk

मुलांनी आईची केली हत्या ?

News Desk