HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा ३२ वर

पुणे | पुण्यात काल (१४ एप्रिल) ४ तासांत ४ कोरोनाबाधितांचामृत्यू झाला होता. तर आज (१५ एप्रिल) पुण्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णांवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. पुण्यात कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ४० वर गेली आहे. तर, ससून रुग्णालयातच आत्तापर्यंत ३२ जणांनी प्राण गमावले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन माहितीही दिली आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी एकाचे वय ७३ वर्ष होते आणि त्यांना किडनीचा आजार होता. तर, दुसऱ्या व्यक्तीचे वय ३४ असून लठ्ठपणाच्या व्याधी होत्या. या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत महाविद्यालये सुरु होणार नाहीत!

News Desk

भाजपने किरीट सोमय्या आणि राणांना रोजगार मिळवून दिलाय; नीलम गोरेंचं टीकास्त्र

Manasi Devkar

दोन्ही छत्रपती जर एकत्र आले तर, महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होणार नाही

News Desk