HW News Marathi
देश / विदेश

इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार

मुंबई | इराणमधील २०० भारतीय नागरिकांना आज (१३ मार्च) मुंबईत आणण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता विमानतळावर हे विमान पोहोचण्याची शक्यता होती. १५ मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यात इराणहून विमान दिल्लीमध्ये येईल. इराणहून तिसऱ्या टप्प्यात १६ किंवा १७ मार्चला विमान दाखल होईल. या संदर्भातील माहिती परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी लोकसभेत काल (१२ मार्च) दिली. कोरोनाचा संसर्ग हा चिंतेचा विषय आहे. इराण, इटलीसह जगभरातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे.

भारताने विदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांच्या प्रवेशावर पूर्ण प्रतिबंध आणला नसल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इराणमध्ये ६००० भारतीय फसले आहेत. यातील ११०० महाराष्ट्रातील प्रवासी आहेत आणि ते इराणच्या कोममध्ये अडकले आहेत, तर जम्मू-काश्मीरचे ३०० विद्यार्थी आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या ५२९ नमुन्यांपैकी २२९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, जयशंकर यांनी सांगितले की, इराणमध्ये १००० भारतीय मच्छीमार अडकले आहेत. यातील कोणत्याही भारतीयाला कोरोनाची लागण झाली नाही. इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल.

जगातील १०० देशांत कोरोना पसरला आहे. काही प्रकरणांत सरकारने ई-व्हिसा आणि व्हिसा ऑन अरायव्हल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीचा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना १५ दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही व्यक्तीला स्वदेशात परतण्यासाठी संक्रमणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य असणार आहे. तसेच, जे विद्यार्थी इराणमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मी श्रीनगरमध्ये भेटलो आहे. आपण त्यांना आश्वासन दिले आहे की, त्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी सुविधा देईल, अशी माहितीही परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षिकेचे विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध

News Desk

मॉनिटर, टीव्हीसह अन्य अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk